News

Latest News

सोनखेड शिवारात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानीची पाहणी

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सोनखेड परिसरात सोयाबीन आणि कापूस पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

मोठी चक्रीवादळे येणार

देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाची कमतरता आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कडून येत्या काही महिन्यांत तीन चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पावसाबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

विकासाच्या नावाखाली जनतेची कथित फसवणूक आणि सरकारच्या घोषणांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सरकारच्या घोषणा आणि प्रत्यक्षात झालेल्या विकासकामांचा हिशेब जनतेसमोर मांडण्याची मागणी केली. या आंदोलनाचा समारोप १७ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

About Manyad Darpan

Manyad Darpan brings timely news, thoughtful stories, and local voices together—keeping readers informed about the people, events, and issues shaping everyday life.